श्रावण महोत्सव
पारंपरिक कला जतन व संवर्धन अंतर्गत श्रावण महिन्यात साजरा होणाऱ्या सणांमध्ये महिलांद्वारे खेळले जाणे खेळ/गाणी याची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि या खेळ आणि गाण्यांचा पारंपरिक ठेवा पुढच्या पिडीला मिळावा यासाठी मुंबईत नामांकित महिला पथकांना बोलवून एकदिवशीय महोत्सव साजरा करण्यात आला.
चाला आणि निरोगी रहा
नवीन पिढीच्या बदललेलया आणि कायमच व्यस्त असणाऱ्या कामाच्या पद्धती आणि शारिरीक स्वास्थाकडे होणारे दुर्लक्ष. नेमकं हेच हेरून सुदृढ राहण्यासाठी सोप्प्यात सोप्पी व्यायामाची पद्धत म्हणजे चालणे. चालणे या व्यायाम प्रकाराची माहिती, महत्व आणि सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मरीन लाईन्स ते गिरगांव चौपाटी दरम्यान चालणे या व्यायाम प्रकाराच्या माहितीचे फलक घेऊन प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने या फेरीची सांगता झाली.
करिअर कसे निवडावे
विद्यार्थ्यांचे शालेय जीवन संपून महाविद्यालयीन पर्व सुरु होत असताना करिअर निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या योग्य निर्णयाचे महत्व ओळखून मंडळाने या विषयातले तज्ज्ञ श्री विवेक फडके यांच्या मार्गदर्शनाखाली “शोध करिअरचा” हे चर्चासत्र आयोजित केले. हे चर्चासत्र विनामूल्य व विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांसाठी होते.
स्वच्छता अभियान
मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त गांधी जयंतीचे औचित्य साधत विभागात स्वच्छता अभियान राबविले. विभागात इतरत्र पडलेले भंगार, अनावश्यक व मोडके सामान साफ करून परिसर स्वच्छ केला.
आदिवासी पाडा / आश्रम शाळेस भेट
सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेचं व्रत मंडळाची तरुणपिढी जोपासत आहे. त्याच अंतर्गत मंडळाने काही आदिवासी जिल्हापरिषदेच्या शाळ, आदिवासी मुलांच्या आश्रम शाळांना भेट देऊन छत्र्या व मुलांसाठी शालोपयोगी वस्तुंचे वाटप केले. सदर उपक्रमासाठी मंडळातील सभासदांनी स्वतःच्या वाढ दिवसाच्या दिवशी स्वेच्छेने देणगी जमा करून या वस्तू खरेदी केल्या.
- डहाणू येथील आशागड आदिवासी मुलांची आश्रम शाळा
- पनवेल निताळे-मानपाडा येथील आदिवासी मुलांची जिल्हापरिषदेशी शाळा,
- पनवेल पेंढारी येथील गुरुकुल विद्यालय
- पनवेल-तळोजा येथील परंशांती वृद्धाश्रम,
- आदिवासी मुलांची रायगड जिल्हापरिषद शाळा, धायरवाडी-पेण
खासदार आपल्या दारी
लवकरच इथे माहिती उपलब्ध होईल.
मासिकपाळी शाप कि वरदान
महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास, त्याचसोबत होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी, जाचक रूढी परंपरा आणि गैरसमज दूर व्हाव्या या विषयावरची शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी मंडळाने या विषयातील तज्ज्ञ डॉ. दिपक खाडे, नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवाद आयोजित केला होता. सदर उपक्रमास विभागातील महिला, तरुणींचा चांगला प्रतिसाद लाभला.
"भाऊ: एक चक्रीवादळ" निवडक उताऱ्यांचे अभिवाचन
सर्व श्रेष्ठ कादंबरीकार भाऊ पाध्ये यांच्या झंझावाती साहित्यातील निवडक उताऱ्यांचे अभिवाचन ‘भाऊ: एक चक्रीवादळ” नुकतेच शनिवार १५ जुलै २०२३ रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर माटुंगा येथे सायंकाळी ५ वा येथे झाले. या कार्यक्रमाचे संकलन व सूत्रसंचालन प्रा. विजय तापस यांनी केले. भाऊंच्या कादंबऱ्यातील काही निवडक उताऱ्याचे अभिवाचन सिने-कलावंत श्री प्रमोद पवार , नारायण जाधव , सुनील सावंत , लेखिका मनस्विनी लता रवींद्र आणि अशोक परब यांनी केले.
श्री नारायण जाधव यांनी भाऊ पाध्ये यांच्या वैतागवडी या कादंबरी मधील अंश वाचून दाखवला. तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेली कादंबरी बॅरिस्टर -अनिरुद्ध धोपेश्वरकर याधील अंशांचं वाचन श्री सुनील सावंत यांनी केले. भाऊंची गाजलेलील कादंबरी वासूनाका मधील अंशाचे वाचन श्री प्रमोद पवार यांनी केले. श्री अशोक परब यांनी राडा कादंबरीमधील अंशाचे वाचन केले. आणि आजच्या पिढीतील लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांनी त्यांनी लिहिलेल्या लोकसत्ता मधील त्यांनी भाऊंवर लिहिलेला लेख वाचून दाखवला.
तसेच भाऊ पाध्ये यांची कन्या श्रीमती आरती शेखर साळुंखे- पाध्ये यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यकमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे चिटणीस श्री नागेश वांद्रे यांनी केले. तसेच मान्यवारांना मंडळाचे अध्यक्ष श्री विजय टाकळे यांनी पुस्तक भेट म्हणून दिली. या कार्यकमास पाप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही मंडळाकडून आभार मानन्यात आले.
या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन रविकिरण मंडळाने केले यासाठी अमित भंडारी व विकास कदम यांचे मार्गदर्शन लाभले.