🎭 ४० वी रविकिरण बालनाट्य स्पर्धा २०२६

नमस्कार,
रविकिरण मंडळ गेली ३९ वर्षे सातत्याने बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करीत आले आहे.

आत्तापर्यंतच्या स्पर्धेत मुंबई व्यतिरिक्त, पुणे, नाशिक, पनवेल, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर या परिसरातील शाळा संस्था स्पर्धेत सहभागी होत आल्या आहेत.

स्पर्धेचं हे चाळीसावं वर्ष आहे. याचे औचित्य साधून चाळीशीत गेलेल्या या स्पर्धेला गावांगावातून सहभाग मिळावा, महाराष्ट्रात सर्वदूर ही बालरंगभूमीची ही चळवळ पोहोचावी म्हणूनच यावर्षी ही स्पर्धा महाराष्ट्राभरात घेण्याचा मानस आहे.

सध्या अद्ययावत तंत्रज्ञान मोबाईल फोन च्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातात पोहोचले आहे. याच उपलब्धतेचा वापर करून या स्पर्धेची प्राथमिक फेरी दृक्श्राव्य स्वरूपात घेऊन त्यातील अंतिम १६ बालनाट्यांची निवड केली जाईल व त्यांची अंतिमफेरी १७-१८ डिसेंबर २०२६ दरम्यान यशवंत नाट्य मंदिर माटुंगा, मुंबई येथे होईल.

👉 अधिक माहिती आणि प्रवेशासाठी इथे क्लिक करा. 👈

रविकिरण आणि साफल्य

१९७७ साली म्हाडाने पुर्नरचित केलेल्या साफल्य इमारतीत राहायला आल्यानंतर या कामगार विभागात रविकिरणने आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांना सुरूवात केली.
दिवाळी श्रमजीवी वर्गांच्या मुलांना फटाक्यांपासून अलिप्त राहण्यासाठी आणि पालकांवर खर्चाचा बोजा येवू नये
तसेच फटाके वाजवून परिसरात प्रदुषण होण्यापासून टाळण्यासाठी संस्थेनं या विविध उपक्रमांना सुरूवात केली.
आणि गेली ४६ वर्षे हे उपक्रम अव्याहतपणे चालू आहेत.
विशेष म्हणजे संस्थेनं सुरू केलेले उपक्रम आता विभागात सर्व ठिकाणी होताना दिसतात.
जणू काही एक चांगला आदर्श कामगार विभाग ठेवण्यामध्ये संस्था यशस्वी झाली.

भेट महापौरांची

मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांची भेट घेऊन मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना २०१९ रोजी बालनाट्य स्पर्धे दरम्यान स्मृतीपूर्ण ही प्रकाशित केलेली स्मरणिका भेट दिली.

यासोबत महापालिकांच्या शाळेत बालनाट्य सादर करून मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयी जनजागृतीसाठी चर्चा करण्यात आली.

किल्ले बांधणी स्पर्धेतील – छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्याची प्रतिकृती

स्मृतीपर्ण