” वाचन कट्टा “
” वाचन कट्टा “
दर रविवारी सकाळी ११ ते १२ वा. रविकिरण कार्यालय, करीरोड मुंबई
दर रविवारी आम्ही मंडळाच्या रूम मध्ये असेच बसलो होतो, पुढील उपक्रम काय घ्यायचे यावर चर्चा चालू होत्या . तेव्हा आमचे स्नेही हेमंत चव्हाण आले, ते म्हणाले आपण असेच दर रविवारी रूम मध्ये येतोच, मग आपण दर रविवारी एक तास वाचन चालू करू. रोज रोज आपण नेहमी मोबाईल वर बघत असतो, थोडा वेळ पुस्तकासाठी देऊ. आमचे चिटणीस विनीत देसाई बोलले “Bombay Bookies” देखील असा उपक्रम राबावतात. त्यामध्ये आपला खारुताईचा वाटा . सर्वांना पटलं . तुकाराम महाराज बोलले आहेत “आधी केले मग सांगितले ” त्याप्रमाणे आपण स्वतः पुस्तक घेऊन यायच आणि किमान एक तास वाचायचं. कधी पासून करायच???मग ठरलं पुढच्या रविवारी २५ में २५ सकाळी ११ ते १२ वा. रविकिरण कार्यालय! या उपक्रमाची सुरुवात मंडळाचे ज्येष्ठ सभासद श्री अरुण राणे यांनी सरस्वती पूजन करून केली.
आम्ही या उपक्रमाला “वाचन कट्टा ” नामकरण केल. या रविवारी आम्ही सुरुवात केली आहे. आपण पण या उपक्रमात सहभागी होऊ शकता.
रविकिरण आयोजित
हेमंत चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि बॉम्बे बुकीज च्या प्रेरणेतून “वाचन कट्टा”
दर रविवारी सकाळी ११ ते १२ वा. रविकिरण कार्यालय, करीरोड मुंबई
रविकिरण आणि साफल्य
१९७७ साली म्हाडाने पुर्नरचित केलेल्या साफल्य इमारतीत राहायला आल्यानंतर या कामगार विभागात रविकिरणने आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांना सुरूवात केली.
दिवाळी श्रमजीवी वर्गांच्या मुलांना फटाक्यांपासून अलिप्त राहण्यासाठी आणि पालकांवर खर्चाचा बोजा येवू नये
तसेच फटाके वाजवून परिसरात प्रदुषण होण्यापासून टाळण्यासाठी संस्थेनं या विविध उपक्रमांना सुरूवात केली.
आणि गेली ४६ वर्षे हे उपक्रम अव्याहतपणे चालू आहेत.
विशेष म्हणजे संस्थेनं सुरू केलेले उपक्रम आता विभागात सर्व ठिकाणी होताना दिसतात.
जणू काही एक चांगला आदर्श कामगार विभाग ठेवण्यामध्ये संस्था यशस्वी झाली.

भेट महापौरांची
मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांची भेट घेऊन मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना २०१९ रोजी बालनाट्य स्पर्धे दरम्यान स्मृतीपूर्ण ही प्रकाशित केलेली स्मरणिका भेट दिली.
यासोबत महापालिकांच्या शाळेत बालनाट्य सादर करून मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयी जनजागृतीसाठी चर्चा करण्यात आली.
किल्ले बांधणी स्पर्धेतील – छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्याची प्रतिकृती

स्मृतीपर्ण
आमचे सह-प्रायोजक

गेली अनेक वर्षे आमचे सह – प्रायोजक राहिलेल्या LIC – भारतीय जीवन बिमा निगम चे आम्ही नेहमीच ऋणी राहू.