दिवाळीत वार्षिक स्नेहसंमेलन सुरु करून दिवाळीच्या चार दिवसात मुलांनी फटाके वाजवू नयेत व आपल्या पालकांनी कष्टाने मिळवलेला पैसा वाया जाऊ नये म्हणून रविकिरण संस्थेनं आजतागायत स्नेहसंमेलनची परंपरा निर्माण केली. या चार दिवसात विविध स्पर्धा, नृत्य, एकांकिका, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल करून केवळ हा कार्यक्रम इमारतीपुरता मर्यादित न ठेवता याचा आस्वाद आजूबाजूचे रहिवाशी हि नियमितपणे घेत आहेत. आज होम मिनिस्टर या मालिकेचा लेखक महेंद्र कदम, विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी ह्यांसारख्या होतकरू कलाकारांना रविकिरण संस्थेने व्यासपीठ निर्माण करून दिलं. सध्याचा आघाडीचा विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांसारखी कितीतरी नावे सांगता येतील.

पाऊलवाट पुरस्कार (शैक्षणिक)

वैयक्तिक समस्यांचे भांडवल न करता प्रतिकूल परिस्थिवर मात करत खडतर परिश्रम घेऊन नवनिर्माणाची पाऊलवाट चोखंदळत शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विद्यार्थी दशेतील पथिकांना शोधून त्यांचा यथोचित गौरव व्हावा याच उद्देशाने “पाऊलवाट” हा पुरस्कार दिला जातो.

पाऊलवाट पुरस्कार (सामाजिक)

कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न करता आपले काम सेवाभावी स्वभावाने निरंतर करत राहणे, त्यातून आपल्या आजूबाजूच्या लोकांना मिळणाऱ्या आनंदालाच सर्वस्व मानणाऱ्या व इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या अवलियांचा यथोचित गौरव व्हावा याच उद्देशाने “पाऊलवाट” हा पुरस्कार दिला जातो.

किल्ले बांधणी स्पर्धा

पारंपरिक कला जतन संवर्धन अंतर्गत किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित जाते. टॉवर संस्कृतीमध्ये दिवाळीच्या सुट्टीत अशा प्रकारच्या स्पर्धा होत नाहीत. मुलांमध्ये गडकिल्ल्याविषयी कुतूहल निमार्ण व्हावे, स्पर्धे निमित्ताने माती पासून किल्ले बनविण्याची कला अवगत व्हावी आणि मुंबईत लोप पावत चाललेल्या या संस्कृतीस जपण्यासाठीचा आमचा प्रयत्न.

बालगायन स्पर्धा

लहान वयात गाणं शिकणाऱ्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा व शास्त्रीय संगीत आणि गाण्याची आवड इतर मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान वयवर्षे १६ पर्यंतच्या मुलांसाठी बालगायन स्पर्धा आयोजित जाते.

अभिवाचन कट्टा

रविकिरण वार्षिक स्नेहसंम्मेलनादरम्यान रविकिरण कट्टा या अभिवाचन कार्क्रमाचे आयोजन केले जाते. नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच वाचलेली कथा, पुस्तकांचा अनुभव सर्वांसोबत वाटावा आणि चांगल्या पुस्तक कथांची माहिती इतरांना व्हावी म्हणून या अभिवाचन कट्ट्याचे आयोजन केले जाते.