जेरुसलेम

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार श्री निळू दामले यांच्या लेखणीतून उतरलेले जेरुसलेम हे पुस्तक ! या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते श्री नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

नाटकी नाटकं

ज्येष्ठ समीक्षक, रंगकर्मी श्री कमलाकर नाडकर्णी यांच्या चाकोरीतली व बिनचाकोरीतली नाटकी नाटकं या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक श्री रत्नाकर मतकरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

ढोल वाजतोय

रविकिरण संस्थेने विजय टाकाळे यांच्या गाजलेल्या पाच एकांकिकेचं ” ढोल वाजतोय ” आणि चार एकांकिका असं पुस्तक प्रकाशित केलं त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखनाचा पुरस्कारही मिळाला.