मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि वाचनालय यांच्या तर्फे बालनाट्य क्षेत्रातील कार्यासाठी २००८ साली ज्योतीर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ऐड फिज निर्मित गगन सदन तेजोमय दिवाळी पहात तर्फे २००८ साली बालनाट्य क्षेत्रातील कार्यासाठी गौरविण्यात आले.
पारंपरिक कला जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनातर्फे २०१५ साली तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे यांच्या हस्ते अनुदानाने गौरविण्यात आले.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि वाचनालय यांच्या तर्फे बालनाट्य व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी २०१० साली भातृभावी पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रयोगात्माक कला, जतन व संवर्धन या क्षेत्रात कार्य केल्याबद्दल रविकिरण मंडळास शासनातर्फे गौरविण्यात आले. महाराष्टचे सांस्कृतिक मंत्री मा श्री विनोद तावडे यांचे हस्ते अनुदानाचा धनादेश दिला.
रविकिरणने गेली ५२ वर्षे प्रायोगिक रंगभूमि आणि बालरंगभूमी साठी केलेल्या कार्याची दखल घेत मुंबई मराठी साहित्य संघातर्फे कै बापूराव पेंढारकर स्मृति पुरस्कार ज्योर्तिभास्कर जयंत साळगांवकर यांच्याकडून प्रदान करण्यात आला.