रविकिरणचा वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ दिनांक २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२२ दरम्यान झाली.
बालगायन स्पर्धा – दिनांक २३ ऑक्टोबर २०२२
दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ ला बालगायन स्पर्धा झाली. त्याला परीक्षक म्हणून आम्हाला मा गिरीश महाडिक लाभले होते. त्यांनी संगीत प्रशिक्षण दिवंगत अच्युत ठाकूर यांच्याकडे झाले तसेच त्यांनी मुबंई विद्यापीठातून संगीत विशारद पदवी प्राप्त केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु दुर्वा विक्रम जगदाळे, द्वितीय क्रमांक कु शर्वरी प्रसन्न लाड, तृतीय क्रमांक, कु. वेदांत सुधीर यादव मिळाला. तसेच विशेष लक्षवेधी म्हणून कु आर्या गजानन साळुंखे हिला गौरवण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा जाईल मॅडम, मा सचिन शेट्ये सर, मा परब सर आणि विशेष आभार मा पद्मजा फेणाणी मॅडम यांच खूप खूप आभार!
या स्पर्धेला आम्हाला विशेष प्रमुख उपस्थिती आमचे स्नेही आणि कार्यसम्राट आमदार मा सुनीलजी शिंदे तसचे आमचे हितचिंतक मा श्री हर्षदजी आचार्य आणि मा श्री खलीलजी शिरगावांकर यांचेही मनःपूर्वक आभार!
किल्ले बांधणी स्पर्धा – २४ ऑक्टोबर २०२२
दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ ला किल्ले बांधणी परीक्षण झाले. त्याला परीक्षक म्हणून आम्हाला मा दिवाकर साटम लाभले होते. ते स्वतः किल्ले भटकंती करत असतात तसेच ते बाण हॅकर या संस्थेचा संस्थापकीय सभासद आहेत. तसेच किल्ले संदर्भात वेगवेगळे ट्रेकचे आयोजन करतात. या स्पर्धेत प्रथम क्रमांक डंकिन ग्रुप, मेघवाडी लालबाग -किल्ले पन्हाळगड (पन्हाळा) – गिरिदुर्ग आणि आम्ही मावळे ग्रुप कोहिनूर मिल चाळ, नायगांव (दादर) – द्वितीय क्रमांक रामसेज किल्ला यांना मिळाला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा जाईल मॅडम, मा सचिन शेट्ये सर, मा परब सर आणि विशेष आभार मा पद्मजा फेणाणी मॅडम यांच खूप खूप आभार!
या स्पर्धेला आम्हाला विशेष प्रमुख उपस्थिती आमचे स्नेही आणि कार्यसम्राट आमदार मा सुनीलजी शिंदे तसचे आमचे हितचिंतक मा श्री हर्षदजी आचार्य आणि मा श्री खलीलजी शिरगावांकर यांचेही मनःपूर्वक आभार!